
कारचा कट लागल्याच्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दुचाकीला कारचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मेहरुण तलाव ट्रॅकवर १२ एप्रिल रोजी घडली. अनुजर शेख शकील (वय १९, रा. फातेमानगर) या तरुणाला चार जणांनी मारहाण केली असून त्यातील एकाने चॉपरने वार केल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर जखमी तरुणावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.





