गुन्हेजळगांव

शनीपेठेत दोन गट भिडले : वाहनांची तोडफोड, दगडफेक, दोन पोलीस जखमी

खान्देश टाइम्स न्यूज | १० ऑगस्ट २०२३ | शनिपेठेतील काट्याफाईल भागात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेला वाद मध्यरात्रीनंतर दोन वाजता पुन्हा उफाळून आल्याने दोन गटात दंगल उसळली. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यात दोन्ही गटात हाणामारी होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले.

काट्याफैल भागात वाहनाचा कट लागल्यावरून रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह पोहचले होते. वाद शमवून त्यांनी जमावाला पांगवले. दरम्यान, मध्यरात्री २ वाजेनंतर पुन्हा वाद उफाळून आला आणि एकमेकांच्याच दिशेने दगडफेक करीत दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. दंगलीत रिक्षांची देखील तोडफोड करण्यात आली असून दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, दगडफेकीत शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी व मुकूंद गंगावणे हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, परिरक्षा वधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्यासह शहरातील अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला होता. तसेच नियंत्रण कक्षेतून अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आलेली आहे.

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. इतर संशयितांची धरपकड करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button