भुसावळ : शहरातील साक्री फाट्याजवळ पायी जाणाऱ्या एका वृद्धाला अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ भुसावळातील साक्री फाट्यावरील घटना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम लक्ष्मण जाधव (वय ६८)असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जळगाव शहरातील राका नगर येथे विक्रम लक्ष्मण जाधव हे वृद्ध आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता विक्रम जाधव हे त्यांचे मित्र सुभाष शुक्ला व रविशंकर जैन यांच्यासोबत भुसावळातील साक्री फाट्याजवळील हॉटेल मधुबन येथे जेवण केल्यानंतर फिरायला निघाले. त्याचवेळी जळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने विक्रम जाधव यांना जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला व हाता पायाला गंभीर इजा झाल्याने विक्रम जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.