जळगाव;- विविध मागण्यांसाठी आज जल जीवन मिशन कंत्राटदार संघटनेतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येऊन १ मार्च यापासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यावेळी प्रसिद्धी पात्रता दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने 31 मार्च पुरता मुदत वाढ न करता डिसेंबर २०२४ पर्यंत देऊन या योजनेमध्ये मक्तेदार यांना समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली असून सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार यांना सुद्धा डिसेंबर 2024 पर्यंत सरसकट मदत वाढ शासनाने द्यावी अशी मागणी यात करण्यात आली आहे. कंत्राटदार संघटनेच्या विविध मागण्या मागण्या न झाल्यास एक मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू ठेवण्यात आले असून जल जीवन मिशन कंत्राटदार संघटनेतर्फे धरणे आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेचे सुरज नारखेडे यांनी बोलताना सांगितले.
या धरणे आंदोलनात दत्ता पाटील ,जीवन जागीरदार ,सुनील पाटील, सुरज वानखेडे, संजय आफरे, संजय पवार, दीपक नारखेडे, निलेश पाटील, अनिता पाटील, किशोर पाटील, रोहन मेढे, राजेंद्र शिरसाट ,जाकीर खान, राकेश ठाकरे, अशोक सोनवणे, गोपाल पाटील ,अक्षय पाटील, शांताराम पाटील, दिलीप पाटील ,सतीश पाटील ,महेश पाटील ,शिरीष पाटील, विवेक पाटील ,पंकज वाघ ,सचिन पाटील, आदींनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.