गुन्हेजळगांवपोलीस

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या

जळगाव; जामनेर येथील घटना

खान्देश टाइम्स न्यूज । १५ मे २०२४ । अलीकडच्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून अनेक घटना कानावर येत आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जामनेरच्या एसआरपीएफ (SRPF) जवानाने राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मूळ जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असलेले प्रकाश कापडे हे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. पण आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. गेली पंधरा वर्षापासून ते एसआरपीएफ मध्ये कार्यरत होते.

बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडली. त्यावेळी घरातील सर्व जण झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेचा पंचनामा सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रकाश कापडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button