इतर

‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

पिंप्राळा भागातील नागरिकांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी पिंप्राळ्यातील काही भागात प्रचार केला. बारीवाडा परिसरातील “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेल्या रांगोळीतून एका भगिनीने दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा पाहून आ. राजूमामा भोळे भारावून गेले. तर प्रचारामध्ये ‘प्रति मकरंद अनासपुरे’ खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

पिंप्राळा भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून व पुष्पहार अर्पण करीत आ. राजूमामा भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. गर्जना चौक, बारीवाडा परिसर, कोळीवाडा परिसर, संत मीराबाई नगर, गणपती नगर, प्रल्हाद नगर, आनंद मंगल सोसायटी, इंद्रदेव नगर, निसर्ग कॉलनी परिसर, साई मंदिर परिसर, नामदेव नगर परिसरातून हुडको परिसरात रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये मकरंद अनासपुरे यांची प्रतिमा असलेले खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी सहभागी होत जनतेकडे आ. राजूमामा भोळे यांच्यासाठी आशीर्वाद मागितले.

बारीवाडा परिसरामध्ये माधुरी हितेश बारी या भगिनीने “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. अनेक महिला भगिनींनी आ. भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी सदिच्छा दिल्या. संत मीराबाई नगर येथे राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी आ. भोळे यांनी साकडे घातले. तसेच माजी नगरसेवक शोभाताई बारी यांच्या घरी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले.

प्रचार रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी नगरसेवक शोभाताई बारी, सुरेश सोनवणे, मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ति महाजन, विजय पाटील, अतुल बारी, शुभांगी बि-हाडे, नीतू परदेशी, चंद्रकांत कोळी, उमेश सूर्यवंशी, योगेश गोसावी, महेंद्र केळकर, किरण भोई, डॉ. जयश्री बारी, माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, कैलास सोनवणे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, कुंदन काळे, उमेश सोनवणे, आशुतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा नियोजन समिती सदस्य योगेश देसले, विनोद देशमुख, सुनिता शिंदे, योगेश पाटील, लता मोरे, पी.एस. पाटील, साजिद पठाण, रिपाई (आठवले) गटाचे पदाधिकारी मिलिंद अडकमोल, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button