खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळ येथे सेवानिवृत्त झालेल्या वृद्धाला 19 लाखात गंडविले

भुसावळ : घरपोच बँकेची सेवा देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिषाखाली एका सेवानिवृत्त वृद्ध कर्मचाऱ्याला 19 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तापी नगरमधील प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय६५) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत.

त्यांना संदीप चौधरी यांनी, १० मार्च २०२३ ते ६ डिसेंबर २०२३च्या दरम्यान  प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या

मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी २५ नोव्हेंबर  रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली.

त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय विजय गायकवाड करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button