मेहरून तलाव परिसरातील घटना
जळगाव-दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मेहरून तलाव परिसरातील गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंट येथे 25 रोजी मध्यरात्री उघडकीस आले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घात की अपघात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला असून याचा पोलीस तपास करीत आहे.
अश्विन दीपक चौरसिया वय 36 रा. गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंट मेहरून जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अश्विन चौरसिया हे 25 रोजी च्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास बळीराम पेठ येथे वडिलांच्या घरून पार्सल घेऊन त्यांच्या गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंट येथील घरी आले होते. रात्री बारा वाजेच्या दरम्यान अश्विन चा लहान भाऊ अक्षय याला अश्विनच्या चालकाच्या पत्नीने फोन करून अश्विनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून घेतली आहे तुम्ही सिविलला जा असा निरोप दिला. त्यानंतर अश्विनी यांचे कुटुंबीय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अश्विनीला तपासून वृत्त घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात व त्याची नोंद करण्यात आली आहे. मयत अश्विन यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे