भडगाव तालुक्यात शाळेच्या पहील्याच दिवशी विदयार्थ्यांना मिळणार पाठयपुस्तके
जळगांव l भडगाव l प्रतिनिधी l तालुक्याचा शैक्षणिक विस्तार हा ८ केंद्रात १२६ शाळांनी व्यापलेला आहे.या शैक्षणिक वर्षात प्रशासकिय स्तरावरुन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेवर मोफत पाठय पुस्तके मिळतील. या आशयाने भडगाव तालुक्यात पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. भडगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या आदेशाप्रमाणे तालुक्यात सर्वच शाळांवर पाठ्यपुस्तके पोहचविण्यासाठी नियोजन सुरू आहे.
दर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीस शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शासन स्तरावरून उपलब्ध करून दिले जातात. यावर्षीही प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे.शिक्षण विस्तार गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत मराठी,सेमी व उर्दु माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचे तालुका स्तरावरून केंद्रस्तर ते शाळास्तरापर्यंत एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रत्येक इयत्तेचे चार भाग वितरण करण्यात यावे यासाठी नियोजन सुरू आहे.