जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल खान यांचे रक्तदान

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल खान यांचे रक्तदान
जळगाव: महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल खान यांनी स्वतः रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये अमोल शिंदे, आरोग्यदूत पितांबर, आरोग्यदूत शिवाजी पाटील आणि भैया पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता.
रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने मोलाचे सहकार्य केले. मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता अशा प्रकारे विधायक आणि गरजू रुग्णांना उपयुक्त ठरेल असा उपक्रम राबविल्याबद्दल वैद्यकीय पथक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.




