जळगाव ( प्रतिनिधी);- बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी केल्यानंतर मनपाच्या नगररचना विभागातील भ्रष्टाचाराचा कारभार उघड झाल्याने राज्याच्या नगररचना विभागाने याची त्वरित दखल घेऊन या विभागाच्या सहाय्यक संचालक पदाचा अतिरिक्त कारभार दिघेश तायडे यांच्याकडून काढून नगर रचनाकार अमोल पाटील यांच्याकडे हा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश शासनाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी काढले आहेत.
दरम्यान मनपाचे रचना सहाय्यक मनोज वनेरे याचा जामीन मंजूर झाला असून गुरुवारी एसीबी चे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील यांच्यासह पथकाने सायंकाळी महापालिकेत माहिती घेऊन कार्यालयातील लावलेले सील उघडले.