मुदतबाहय साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने केला साठा नष्ट
जळगाव प्रतिनिधी I
विविध दुकानांची तपासणी करून अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात आज दि. 15 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवून दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण 14 नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. मे. रविराज एजन्सी, विसनजी नगर, जळगाव यांच्याकडे दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा सुमारे रु. 4095/- रुपयांचा साठा हा मुदतबाहय असल्याचा आढळून आल्यामुळे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्नवापर होवून नये म्हणून तत्काळ विक्रेता यांच्या समोरच हा साठा नष्ट करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमावली अंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर, सह आयुक्त ( नाशिक विभाग ) म.ना.चौधरी, जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त ( अन्न ) सं.कृ.कांबळे व अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व श.म.पवार यांनी केली . याबाबतची माहिती जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त ( अन्न ) सं.कृ.कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.