
चोसाकाचे माजी कार्यकारी संचालक यांची गळफास घेत आत्महत्या
चोपडा प्रतिनिधी येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त शेतकी अधिकारी तथा माजी प्रभारी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी (वय ६२, रा. गुरुदत्त कॉलनी) यांनी दि.२९ बुधवार रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे.
सविस्तर वृत्त असे की, यावल रोडवरील गुरुदत्त कॉलनी मधील रहिवासी असलेले (मुळगाव वडती, ता. चोपडा) चोसाकाचे माजी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी यांनी त्यांच्या राहत्या घरात दि.२९ च्या सकाळी गळफास घेत आत्महत्या केली असून त्यांच्यावर अंत्य संस्कार त्यांच्या मूळगावी वडती येथे संध्याकाळी करण्यात आले. सदर घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. ते अब्दूल पिंजारी व अब्बास पिंजारी यांचे लहान बंधू तर जुनेद पिंजारी यांचे वडील होत.