खान्देशजळगांव

फैसल पटेल  मृत्यू प्रकरण: विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने त्वरित बस सुरू करावी 

फैसल पटेल  मृत्यू प्रकरण: विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने त्वरित बस सुरू करावी 

एकता संघटनेची महाविद्यालयाकडे मागणी

जळगाव प्रतिनिधी

अरुणामाई फार्मसी महाविद्यालयाने ज्याप्रमाणे मुलींसाठी जळगाव ते ममुराबाद बस सेवा सुरू केली आहे त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बस सेवा उपलब्ध करून द्यावी, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नाही म्हणून विभाग नियंत्रक यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या थांबवण्यात याव्या, रस्ता हा अरुंद व उंच सखल असल्याने सरळ करण्यासाठी पालकमंत्री, आमदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा नियोजन समिती शी संपर्क साधून आवश्यक ती उपाययोजना करावी व सर्वात महत्त्वाचे महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून गौण खनिज ची वाहने भरगाव वेगाने जात असतात त्याबाबत पोलीस स्टेशन, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती उपाययोजना करावी अशा आशयाचे निवेदन एकता संघटनेतर्फे अरुणाबाई कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर तुषार देशमुख यांना मयत विद्यार्थ्यांचे नातेवाईक जकी पटेल व आकिब पटेल यांच्या हस्ते  देण्यात आले.

१ मार्च रोजी कॉलेज ऑफ फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थी पटेल फैसल याला डंपरले चिरडले होते त्यात त्याचा मृत्यू झाला असून सदर प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे तपास सुरू आहे.

प्राचार्यांचे आश्वासन
सदर निवेदनातील मागण्याबाबत प्राचार्यांनी सकारात्मक धोरण दाखवत संस्था चालक यांच्याशी चर्चा करून याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

एकता संघटनेची शिष्टमंडळ
मुराबाद येथे महाविद्यालयात एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख, संघटक नदीम मलिक, मजहर पठाण, अनिस शहा, मतीन पटेल,मुश्ताक पिंजारी ,युसूफ पठाण, सलीम इनामदार, कासिम उमर, इमरान गनी सह जकी पटेल व आकिब पटेल यांची उपस्थिती होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button