विनायक पाटील आणि धर्मरथ फाऊंडेशनचे प्रभाग क्र.२ मध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य

जळगाव प्रतिनिधी l शहरातील प्रभाग क्र.२ मधील विनायक किशोर पाटील यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
प्रभाग क्रमांक दोन हा परिसर हिंदु-मुस्लिम-बौध्द वसाहत असलेला असून याच परिसरात बहुसंख्य समाज बांधव कैक वर्षापासून गुण्या-गोविंदाने नांणद आहेत.
याच प्रभागात सण उत्सव साजरे करण्यात सर्व हिरीरीने विनायक पाटील यांच्या धर्मरथ फाऊंडेशनचा सहभाग हा वाखण्याजोगा असतो.
रुग्णसेवा असो वा अन्यायपिडीत विनायक पाटील यांच्या धर्मरथ फाऊंडेशनच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधला असता त्वरित निरसरन झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असते.
या प्रभागातील नवीन वर्षाची सुरुवातच हि विनायक पाटील यांच्या धर्मरथ फाऊंडेशने दिनदर्शिकेने होताना दिसून येते, त्या दिनदर्शिके मध्ये प्रभागातील सर्व आपत्पकालिन सेवेचे दुरध्वनी क्रमांक व प्रभागातील सर्व लहान मोठ्या व्यवसायाचे संपर्क दिसून येतात, प्रभागातील जेष्ठ, वरिष्ठ नागरिकांचे वाढदिवस यात समिविष्ट आहेत.
रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिर, आपले सरकार शिबिरामार्फत प्रभागातील हजारो नागरिकांना लाभ कसा होईल याचा विचार नेहमी व सतत करत असणारे विनायक पाटील यांनी जनसेवेचा विडाच जणू उचलल्याचे दिसून येते.
सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य व कृषी क्षेत्रात 2016 रोजी पुरस्कार मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री महाराष्ट्र) व मा.श्री.गिरीशजी महाजन पुरस्कार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
यासह असंख्य लहान मोठ्या पुरस्कारांचे धनी असलेले धर्मरथ फांउडेशनचे विनायक पाटील मागील पंधरा वर्षापासून जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून काम ते पाहत आहेत.
कोरोना काळात अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये धावून जाऊन व जेवण वाटप केलेले आहे यामुळे जळगावचे कलेक्टर व आयुक्त यांच्याकडून सुद्धा प्रमाणपत्र देऊन विनायक पाटील यांना गौरविण्यात आले आहे.
रेल्वे सल्लागार समिती सदस्य भुसावळ विभाग रेल्वे आणि प्रवाशांचा मधला प्रश्न सोडवले आहे.
गणेशोत्सव,नवरात्रौत्सव,शिवजयंती,१४ एप्रिल, यांचे स्वागत व्यासपीठ प्रभागातील नागरिकांच्या काळजाचा ठाव घेणारे आहे.
दांडगा जनसंपर्क, सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अश्या स्वभावाचे व्यक्तिमत्व धर्मरथ फाऊंडेशन मार्फत विनायक पाटील जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले दिसून येते.