
यावल (प्रतिनिधी) – यावल शहरातील अनेक जबाबदार नागरिक आणि तरुणांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) वर विश्वास व्यक्त करत १२ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला.
या वेळी अनेक तरुणांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून, एसडीपीआय हाच सामान्य जनतेचा आवाज असून, पक्ष समाजातील प्रत्येक घटकासोबत उभा आहे, असे मत व्यक्त केले.
पक्षात प्रवेश घेतलेल्या नवीन सदस्यांनी, पक्षाच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा आणि न्यायासाठीची लढाई अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मौलाना कासिम नदवी आणि खजिनदार चिरागुद्दीन शेख उपस्थित होते.





