नव्या राजकीय समीकरणाची नांदी? पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शरद पवार यांनी केला एकत्र प्रवास!
जळगाव – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेतून सोबत प्रवास करतांना दिसून आले. यामूळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दि. 16 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी गुरुवारी शरद पवार हे मुंबई येथून रेल्वेत बसले. यादरम्यान शरद पवार ज्या डब्यात होते, त्या डब्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुध्दा दिसून आले. गुलाबराव पाटील व शरद पवार एकाच डब्यातून प्रवास करतांना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
य वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासात दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली की, नाही ? याबाबत मात्र नेमकं कळू शकले नाही.