इतर

उन्मेष पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

उन्मेष पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांसह पक्षात प्रवेश

जळगाव : उबाठा गटाचे जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शेकडो समर्थकांसह आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उन्मेष पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना खान्देशात शिवसेना घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

उन्मेष पाटील यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती व माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दीपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहित खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनीता पवार, रत्ना पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला.

या प्रसंगी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार मिलिंद देवरा, आमदार किशोर पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button