
अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत
प्रतिनिधी I जळगाव
जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती झाली असून शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी त्यांच्या या नियुक्तीचे आदेश जरी केले आहेत .
जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य पोलिस सेवेतील अपर पोलिस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने तीन अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. नखाते यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश निघणार असल्याने त्यांची नियुक्ती कुठे करण्यात आली हे लगेच समजू शकले नाही.
जिल्ह्यात कामाचा अनुभव
संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगावचे पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे त्यांना जिल्ह्याची माहिती आहे भुसावळ विभागाची धूराही त्यांनी सांभाळली होती. त्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हावासीयांना गावीत यांच्या कार्याची पद्धत माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याला होणार आहे.





