खान्देशजळगांवसामाजिक

माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ मोहिमेला प्रारंभ; स्वच्छता दूतांची नियुक्ती

माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ मोहिमेला प्रारंभ; स्वच्छता दूतांची नियुक्ती

महापौर दीपमाला काळे यांची पुढाकार; लोकसहभागातून स्वच्छतेवर भर

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्वच्छता क्षेत्रात सक्रिय असलेल्या नागरिकांवर ‘स्वच्छता दूत’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गुरुवार, २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता महानगरपालिकेत आयोजित विशेष बैठकीत या स्वच्छता दूतांना महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते अधिकृत ओळखपत्रांचे (आयकार्ड) वाटप करण्यात आले.

इंदोरच्या धर्तीवर जळगावचा कायापालट करणार!
याप्रसंगी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “जळगाव शहर स्वच्छ करण्यासाठी केवळ महापालिका प्रशासन किंवा आरोग्य विभागावर अवलंबून राहून चालणार नाही, तर यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे अनिवार्य आहे. इंदोर शहराच्या धर्तीवर आपल्याला ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ ही संकल्पना यशस्वी करायची आहे. प्रत्येक प्रभाग स्वच्छ राहावा आणि तिथे स्वच्छतेचे नवनवीन उपक्रम राबवले जावेत, यासाठी स्वच्छता दूतांनी पुढाकार घ्यावा.”

नागरिकांच्या सूचनांची दखल
बैठकीत उपस्थित नागरिकांनी प्रभागातील स्वच्छतेबाबत अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या. या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून, त्यावर भविष्यात प्रभावीपणे काम केले जाईल, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले. बैठकीचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चौधरी व स्वीय सहाय्यक दुर्गेश सैंदाणे यांनी केले.

मेहरूण तलाव स्वच्छतेवर भर
ओळखपत्र वाटप झाल्यानंतर स्वच्छतादूतांची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत जळगावचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाची स्वच्छता कशी राखता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभागांमध्ये कोणते उपक्रम राबवता येतील, याविषयी डॉ. हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. इतर स्वच्छता दूतांनीही आपापल्या प्रभागातील स्वच्छतेच्या नियोजनाबाबत विविध मते मांडली.या मोहिमेमुळे आता जळगाव शहरात स्वच्छतेसाठी एक व्यापक लोकचळवळ उभी राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button