खान्देशगुन्हेजळगांव

धडाकेबाज कारवाई: ५ लाखांच्या बदल्यात २५ लाखांचे आमिष दाखवणारी टोळी जेरबंद

धडाकेबाज कारवाई: ५ लाखांच्या बदल्यात २५ लाखांचे आमिष दाखवणारी टोळी जेरबंद

जळगाव LCB कडून वाशिमच्या पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांना बेड्या

​जळगाव (प्रतिनिधी): गुंतवणुकीवर अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून ५ लाख २० हजारांना गंडा घालणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) २४ तासांच्या आत छडा लावला आहे. छत्रपती संभाजीनगर जवळील करमाड येथून या टोळीला अटक करण्यात आली असून, यामध्ये वाशिम पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना आणि फसवणुकीचा सापळा

​चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जगदीश शंकर व्यास यांना अज्ञात भामट्यांनी १ लाखाच्या बदल्यात ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. २७ एप्रिल रोजी हॉटेल कमल पॅराडाईज येथे व्यवहारासाठी बोलावण्यात आले. फिर्यादींचा मुलगा पंकज व्यास ५ लाख २० हजार रुपये घेऊन आला असता, आरोपींनी “पोलीस चेकिंग सुरू आहे” असे सांगून त्याला कारमध्ये बसवले आणि भुसावळच्या दिशेने नेले. वाटेत संधी साधून आरोपींनी ५ लाख २० हजारांची रोकड हिसकावून घेत पळ काढला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ८६/२०२६) दाखल करण्यात आला होता.

अशी झाली अटक

​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना ही टोळी करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील हॉटेल एकता जवळ असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने तातडीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

प्रकाश लक्ष्मण शिंदे (४०, रा. पेनवोरी, जि. वाशिम) स्वप्नील दिलीप दळवी (३३, रा. वाशिम) – याचेवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. भागवत दत्ताराव कष्टे (४०, रा. करडा, जि. वाशिम) – पोलीस अंमलदार, मुख्यालय वाशिम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तपास पथकातील ‘ अधिकारी व कर्मचारी

​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली
​ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड
​अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक शरद वागल
​ सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख. पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस अंमलदार राहुल रगडे, रविंद्र कापडणे, छगन तायडे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण हिवराळे. ​तांत्रिक मदत: गौरव पाटील, मिलींद जाधव, ईश्वर पाटील आणि प्रदिप सपकाळे.

पुढील कारवाई

​अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या टोळीने महाराष्ट्रात इतरत्रही असे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
​पोलिसांचे आवाहन: नागरिकांनी अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. कमी वेळात जास्त पैसे मिळवून देण्याचे सांगणारे लोक फसवणूक करणारे असू शकतात, याची जाणीव ठेवावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button