खान्देशगुन्हेजळगांव

हळदीत गावठी कट्ट्यासह नाचणाऱ्या युवकाच्या मुसक्या आवळल्या; कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हळदीत गावठी कट्ट्यासह नाचणाऱ्या युवकाच्या मुसक्या आवळल्या; कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई


​कासोदा | प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील ताडे येथे एका हळदी समारंभात कमरेला गावठी कट्टा लावून मिरवणाऱ्या लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) या २१ वर्षीय युवकाला कासोदा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून, या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​नेमकी घटना काय?

दिनांक ३ मे रोजी ताडे येथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी बँडच्या तालावर नाचताना लखन वाघ याच्या कमरेला पिस्तूल असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. लोकांनी विचारणा करताच गर्दीचा फायदा घेऊन तो तेथून पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

​सापळा रचून केली अटक

५ मे रोजी तो पुन्हा काहीतरी गु करण्याच्या उद्देशाने ताडे गावाकडे येत असल्याची गुप्त माहिती सपोनि श्रीकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भातखेडे चौफुलीवर सापळा रचला. संशयित लखन वाघ दिसताच त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, निलेश गायकवाड, योगेश पाटील आणि सोनू पाचुंदे यांच्या पथकाने केली. आरोपीवर कासोदा पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button