खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून NDPS प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून NDPS प्रकरणातील फरार आरोपी अटकेत
जळगाव : एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अॅन्टी नारकोटीक्स टॉस्किंग फोर्स, नाशिकच्या पथकाने जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली आहे. शाहरुख सिराज भिस्ती (वय ३१, रा. शाहूनगर, नुरानी मशिदीजवळ, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी पोलीस स्टेशन, धुळे येथे भाग-६ गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४/२०२५ तसेच सीसीटीएनएस क्रमांक २५८/२०२५ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क), २१(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी शाहरुख भिस्ती हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

दरम्यान, आरोपी जळगाव शहरात असल्याची गुप्त माहिती अॅन्टी नारकोटीक्स टॉस्किंग फोर्सला मिळाली होती. त्यानुसार पोहेकॉ. रेहान सादिक खान, पोहेकॉ. कालीचरण बिहाडे, पोकॉ. प्रभाकर ढसाळ यांच्यासह जळगाव पोलीस मुख्यालयातील पोकॉ. योगेश जोशी व पोहेकॉ. संघपाल तायडे यांनी संयुक्त कारवाई केली.

दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आरोपी संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button