खान्देशगुन्हेजळगांव

नशिराबाद नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत २३ विषयांना मंजुरी; प्रवेशद्वारांना संत व सूफी संतांची नावे

नशिराबाद नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत २३ विषयांना मंजुरी; प्रवेशद्वारांना संत व सूफी संतांची नावे

नशिराबाद : नशिराबाद नगरपरिषदेची तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा दि. ५ मे २०२६ रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात यशस्वीरित्या पार पडली. सभेमध्ये शहर विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली असून एकूण २३ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेतील विषय क्रमांक २ अंतर्गत शहरातील विविध चौक व कॉलनींमध्ये दिशादर्शक फलक उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जळगावकडून शहरात प्रवेश करणाऱ्या नवीन प्रवेशद्वारास “श्री संत झिपरूअण्णा महाराज प्रवेशद्वार” असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच उंट विडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रवेशद्वारास हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या सूफी संत हजरत पीर यासीन मिया कादरी यांचे नाव देण्याचा निर्णयही सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या निर्णयामुळे शहरातील सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि हिंदू-मुस्लिम एकता अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास नगरपरिषदेतील सदस्यांनी व्यक्त केला. तसेच शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अधोरेखित करणारे हे निर्णय ठरणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

सभेला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरपरिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button