खान्देशगुन्हेजळगांव

किरकोळ कारणावरून ७७ वर्षीय वृद्धाला मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल

किरकोळ कारणावरून ७७ वर्षीय वृद्धाला मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल

अजिंठा चौफुलीजवळ तीन अज्ञातांकडून हल्ला; आरोपींचा शोध सुरू

जळगाव : शहरात किरकोळ कारणावरून एका ७७ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेख उस्मान शेख मुराद (वय ७७, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे १० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता अजिंठा चौफुली, अयोध्या नगर गेटजवळ सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होते. त्याचवेळी कोणत्याही कारणाशिवाय तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
हा वाद काही क्षणातच हाणामारीत रूपांतरित झाला. तिन्ही अज्ञात व्यक्तींनी वृद्धाला मारहाण करून शारीरिक दुखापत केल्याची माहिती आहे.

घटनेनंतर पीडित शेख उस्मान यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि कलम ३५१(२) (धमकी/अपमान) नुसार केली आहे.

या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे (बक्कल नं. ३१२३) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी अद्याप अज्ञात असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button