
बंद घर फोडून ४५ हजारांची रोकड लंपास
सिद्धीविनायक नगरातील घटना; तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सिद्धीविनायक नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेरगावी गेल्याची साधली संधी
सिद्धीविनायक नगरातील रहिवासी मुकुंदा प्रताप शिरसाठ (वय ३७) हे शिक्षक असून ते २३ मे रोजी कुटुंबियांसह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला.
कपाटातील रोकड लंपास
चोरट्यांनी घरातील बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यात ठेवलेली ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार २३ मे ते २६ मे दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
घरी परतल्यानंतर चोरीचा उलगडा
२६ मे रोजी मुकुंदा शिरसाठ कुटुंबासह घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोहेकॉ श्रीकांत बदर करीत आहेत.





