इकरा शिक्षण संस्थेकडून डॉ. शेख हारून शेख बशीर यांची शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती

इकरा शिक्षण संस्थेकडून डॉ. शेख हारून शेख बशीर यांची शैक्षणिक सल्लागारपदी नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी इकरा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सालार नगरचे माजी प्राचार्य डॉ. शेख हारून शेख बशीर यांची इकरा शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक सल्लागार (Educational Advisor) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीस नवी दिशा मिळणार असल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
डॉ. शेख हारून शेख बशीर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात इकरा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, शिक्षकांमध्ये शैक्षणिक नवोपक्रमांची जाणीव निर्माण करणे, तसेच संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त व पारदर्शकता आणणे यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे.
दि. 31 मे 2026 रोजी ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा प्रदीर्घ अनुभव, शैक्षणिक दृष्टीकोन, नेतृत्वगुण आणि संस्थेविषयीची निष्ठा लक्षात घेऊन इकरा शिक्षण संस्थेने त्यांच्यावर पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संपूर्ण संस्थेला भविष्यातही मिळावा या उद्देशाने त्यांची शैक्षणिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
डॉ. शेख हारून शेख बशीर यांनी आपल्या कारकिर्दीत शैक्षणिक गुणवत्ता, नैतिक मूल्ये आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण यांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन केले असून संस्थेची शैक्षणिक प्रतिष्ठा उंचावण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.या वेळी माजी शिक्षक आमदार श्री सुधीर तांबे साहेब (नाशिक विभाग) छोटू सर, गरुड सर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर श्री शेख हारून शेख बशीर सरांचे त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार केले.
त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे संस्थेच्या शैक्षणिक धोरणांना अधिक बळ मिळेल, शिक्षकांना योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन उपक्रम राबविण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. शेख हारून शेख बशीर यांच्या या सन्माननीय नियुक्तीबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.





