
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये योग दिन आणि वर्षातील सर्वात मोठ्या दिवसानिमित्त विविध उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच वर्षातील सर्वात मोठ्या दिवसानिमित्त विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
योग प्रशिक्षक निगार शाह यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने व व्यायाम प्रकारांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुझहत मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यालयाचे प्राचार्य रियाज शाह यांनी दिवस-रात्र कालावधी, वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो तसेच त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी या विषयावर आकर्षक सादरीकरण व विविध शैक्षणिक उपक्रम सादर केले.
यावेळी पर्यवेक्षक झाकीर सर, बरकत सर, जावेद सर, रिफत मॅडम, तरन्नुम मॅडम, इमरान सर, मंजूर सर, मोहसीन सर, फरहान सर यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये योग, आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





