गुन्हेजळगांव

धक्कादायक : जळगावातील केबलवर पाकिस्तानी चॅनलचे प्रक्षेपण, दीपक गुप्ता यांची तक्रार

खान्देश टाइम्स न्यूज | १५ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील G.K. इंटरटेनमेंटद्वारे संचालन केले जाणाऱ्या केबल नेटवर्कवर तब्बल ६ पाकिस्तानी प्रसारीत होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानी चॅनलबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी स्थानिक प्रशासनापासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, या केबल नेटवर्कचे संचालन भाजप खा.रक्षा खडसे यांच्या संस्थेमार्फत होत असल्याचे देखील गुप्ता यांनी म्हटले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार, जळगाव शहरात दोन मोठ्या स्वरुपाचे केबल नेटवर्क सुरु आहेत. यातील एक केबल नेटवर्क जी.के. इंटरटेनमेंट हे खा.रक्षा खडसे यांच्या अधिपत्याखाली सुरु असल्याचे म्हटले जात आहे. हजारोच्या संख्येत ग्राहक असलेल्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाकिस्तानी कार्यक्रम सुरु असल्याची माहिती सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना समजली. त्या माहितीची खात्री होण्यासाठी गुप्ता यांनी त्या कार्यक्रमांचे स्क्रिन शॉटस उपलब्ध केले आहेत. केटीएन न्यूज, केटीएन संगीत, केटीएन कशिष, सिंध टीव्ही, सिंध न्यूज असे हे प्रमुख पाकिस्तानी चॅनल आहेत.

14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील स्वतंत्रता दिनाचा कार्यक्रम, पाकिस्तानी नागरिकांची घोषणाबाजी आदी दृश्य या चॅनलवर बिनधास्त दाखवण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. गुप्ता यांनी हैथवे जिओ केबल नेटवर्कद्वारे चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे स्क्रिन शॉट देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी योग्य ती चौकशी आणि कारवाई होण्याची मागणी दीपककुमार गुप्ता यांनी स्थानिक प्रशासनासह पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button