पोलिस खात्यात हालचाल !
तिकडचे पाटील इकडे,इकडचे आव्हाड तिकडे ; जिल्ह्यात १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलिस खात्यात हालचाल !
तिकडचे पाटील इकडे,इकडचे आव्हाड तिकडे ; जिल्ह्यात १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत. विशेषतः स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या बदलचे आदेश रात्री उशिरा काढले
.दरम्यान, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.
बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे:
अधिकारी नेमणूक नवीन ठिकाण
पोनि. बबन आव्हाड एलसीबी, एमआयडीसी
पोनि. संदीप पाटील एमआयडीसी ,एलसीबी
पोनि. कावेरी कमलाकर चोपडा ग्रामीण ,शनिपेठ
पोनि. दत्तात्रय निकम अमळनेर ,अमळनेर
पोनि. रंगनाथ धारबळे शनिपेठ, यावल
पोनि. प्रदीप ठाकूर यावल जिल्हा पेठ
पोनि. सुनील पवार पारोळा, नियंत्रण कक्ष
सोपनि. प्रमोद कठोरे आर्थिक गुन्हे शाखा, पहूर
सोपनि. जनार्दन खंडेराव वरणगाव ,यावल
सपोनि. अमितकुमार बागुल भुसावळ बाजारपेठ, वरणगाव
सपोनि. प्रकाश काळे पिंपळगाव हरेश्वर जळगाव शहर
सापोनि. कल्याणी वर्मा जळगाव शहर, पिंपळगाव हरेश्वर
पोउनि. सोपान गोरे पाचोरा ,एलसीबी
या बदल्यांमुळे जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांच्या कारभारात लवकरच बदल दिसून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एलसीबीमधील अनुचित प्रकारांवर विभागीय पातळीवर चौकशी सुरू आहे.