
सुषमा ह. प्रधान यांचे निधन
जळगाव : न्यू इरा एज्युकेशन सोसायटी, जळगाव संचलित रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिरच्या सदस्या तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांच्या सासूबाई सौ. सुषमा ह. प्रधान यांचे गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
सौ. सुषमा प्रधान यांच्या निधनाने प्रधान परिवारासह रोझलँड परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे रोझलँड परिवाराने एक जिव्हाळ्याची व्यक्ती गमावली असून, त्यांच्या प्रेमळ सहवासाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
या दुःखद प्रसंगी रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिरच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रधान परिवाराप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच दिवंगत सौ. सुषमा प्रधान यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





