खान्देशगुन्हेजळगांव

सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न

सायबर सुरक्षा जनजागृतीविषयी इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटी संपन्न

जळगाव : आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथे दि. ०८/०८/२०२६, शनिवार रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती.

या सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यामध्ये ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

संवादात्मक व प्रभावी पद्धतीने घेण्यात आलेल्या या इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी व्यक्तींनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प केला.

या इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीसाठी आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथील उपस्थितांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button