खान्देशगुन्हेजळगांव

भरधाव वाहनाच्या धडकेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव वाहनाच्या धडकेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

कावडयात्रेदरम्यान म्हाळसादेवी मंदिराजवळ भीषण अपघात; चोपड्याच्या वाहनचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहराजवळ ममुराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदिर परिसरात कावडयात्रेदरम्यान भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रबल राजू गवळी वय ७ वर्षे रा. शनिपेठ, गवळीवाडा, राधाकृष्ण मंदिराजवळ, जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे.

कावडयात्रेदरम्यान अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास प्रबलआपल्या वडिलांसह व नातेवाईक-मित्रांसोबत जळगाव ते ममुराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदिर येथे कावडयात्रा पूर्ण करून पायी जळगावकडे परतत होता. यावेळी ममुराबादकडून जळगावकडे जाणारे वाहन क्रमांक MH-20-EG-3593 भरधाव वेगाने येत होते.

पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक

वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविले. रस्त्याच्या कडेला कावडयात्रेतील नागरिक पायी चालत असतानाही चालकाने वाहनाचा वेग कमी केला नाही. त्यामुळे वाहनाने चिमुकल्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याला गंभीर दुखापत झाली.

उपचारापूर्वीच मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चोपड्याच्या चालकाविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/2026 अन्वये सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक उबेदखान इकबालखान पठाण (रा. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेचा पुढील तपास सपोनि नयन छबूलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाची तसेच चालकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button