इतर

फैजपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याअल्पसंख्यांक सेलच्या संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!

फैजपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याअल्पसंख्यांक सेलच्या संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!

रावेर लोकसभा क्षेत्रात पक्षबांधणीला नवी दिशा; राजेश वानखेडे यांच्या हस्ते शुभारंभ”

फैजपूर प्रतिनिधी : रावेर लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीच्याअल्पसंख्यांक सेल चा संघटनात्मक वाटचालीला नवी ऊर्जा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड आज फैजपूर येथे घडली. दि. २९ ऑगस्ट रोजी नायरा पेट्रोल पंपाशेजारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्यांक सेल रावेर लोकसभा क्षेत्राच्या संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.

सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी फैजपूर शहराध्यक्ष रज्जाक भाई, दोस्ताना मित्र परिवारातील शेख कुर्बान मेंबर, हमीद शेट, भूपेंद्र भाई, अमजद शेट, आवेश भांजा, वसीम जनाब, गौरव चौधरी, पवन परदेशी, आशिष कपडे, जफर अली, हुजेफ खान, आकाश चौधरी, प्रवीण तायडे, युनूस खान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून रावेर लोकसभा क्षेत्रातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच नागरिकांशी थेट संपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणे आणि आगामी राजकीय वाटचालीला बळकटी देणे, या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा यावेळी पाहायला मिळाली.

उद्घाटन कार्यक्रमामुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, फैजपूरसह रावेर लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादीच्या संघटनात्मक हालचालींना आता वेग येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नव्या संपर्क कार्यालयातून जनसंपर्काला बळ… संघटन मजबूत करण्याचा निर्धार… आणि रावेर लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची नवी राजकीय इनिंग सुरू!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button