खान्देशगुन्हेजळगांव

मोहाडी येथे कौटुंबिक त्रासातून मुलाचा खून; आत्महत्येचा बनाव रचणारे आई-वडील अन् भाऊ गजाआड

मोहाडी येथे कौटुंबिक त्रासातून मुलाचा खून; आत्महत्येचा बनाव रचणारे आई-वडील अन् भाऊ गजाआड

​एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा पर्दाफाश

जळगाव प्रतिनिधी मोहाडी (ता. जळगाव) येथे महिनाभरापूर्वी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेमागे खुनाचा प्रकार असल्याचे एमआयडीसी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सततच्या दारूच्या व्यसनाला आणि मारहाणीला वैतागून आई-वडील आणि भावानेच २५ वर्षीय तरुणाचा गळफास देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या आई-वडिलांसह भावाला अटक केली आहे.

राधेशाम हरचंद राठोड (वय २६) या तरुणाने ३१ जुलै रोजी गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु, पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रावले. चौकशीदरम्यान कौटुंबिक वादातून राधेशामचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. घटनेच्या दिवशी संशयित आरोपी आई मीराबाई राठोड, वडील हरसिंग राठोड व भाऊ सचिन राठोड यांनी संगनमत करून राधेशामचा गळफास आवळून खून केला आणि नंतर हत्येसाठी वापरलेली दोरी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी हळहळ व खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button