खान्देशजळगांवसामाजिक

शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकासाठी फैजपुरात जागा द्या

शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकासाठी फैजपुरात जागा द्या

नगरसेवक शेख युनूस शेख अय्युब यांचे नगरपरिषदेकडे निवेदन

फैजपुर | प्रतिनिधी

भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या शौर्याची आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा भावी पिढीला मिळावी, यासाठी फैजपुर शहरात त्यांच्या स्मारकासाठी नगरपरिषद मालकीची योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात फैजपुर नगरपरिषदेचे नगरसेवक शेख युनूस शेख अय्युब यांनी दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी नगराध्यक्षा दामिनी सराफ यांना निवेदन सादर केले.

शहीद अब्दुल हमीद यांनी देशाच्या रक्षणासाठी दाखविलेल्या अदम्य शौर्याला भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे. त्यांच्या बलिदानाची आणि देशसेवेची प्रेरणा आजच्या पिढीसह भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी फैजपुर शहरात त्यांचे स्मारक उभारणे ही अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

फैजपुर नगरपरिषदेच्या मालकीची स्मारक उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी शहीद अब्दुल हमीद यांचे भव्य व सुशोभित स्मारक उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तसेच परवानग्या देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक शेख युनूस शेख अय्युब यांनी केली आहे.

स्मारक उभारल्यामुळे फैजपुरच्या वैभवात भर पडण्याबरोबरच शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांना देशभक्ती, शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल. शहीद अब्दुल हमीद यांच्या जीवनकार्याची माहिती नव्या पिढीला मिळण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थळ ठरू शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहीदांच्या शौर्याला अभिवादन करणारे आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे स्मारक फैजपुर शहरात उभारण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नगरसेवक शेख युनूस शेख अय्युब यांनी व्यक्त केली आहे.

फोटो –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button