खान्देशजळगांव

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अभिवादन

जळगाव | प्रतिनिधी

लोकशाहीर, साहित्यसम्राट, समाजसुधारक आणि शोषित-वंचितांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि. १८ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन आणि महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी नगरसेवक राजू मोरे, महानगर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई अंभोरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश निलेश सांगळे, नरेंद्र साठे, राजू गायकवाड, नितीन गायकवाड, पौर्णिमा गायकवाड, नितीन सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button