खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

आर. आर. विद्यालयात पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात

शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेतील सुविधांवर चर्चा

आर. आर. विद्यालयात पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात

शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेतील सुविधांवर चर्चा

जळगाव, प्रतिनिधी : आर. आर. विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात पार पडली. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश रमणलाल भावसार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

सभेत पालकांमधून उपाध्यक्ष, शिक्षकांमधून सचिव, सहसचिव तसेच पालकांमधून एका सहसचिवाची निवड करण्यात आली. यासोबतच कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

वर्षभर राबविण्यात येणारे विद्यार्थीपूरक उपक्रम, शैक्षणिक घडामोडी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि शालेय उपक्रमांमध्ये पालकांचा अधिकाधिक सहभाग कसा वाढविता येईल, यावर सभेत चर्चा करण्यात आली. पालकांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून शिक्षकांचे आभार मानले. त्याचवेळी अस्वच्छ शौचालये आणि पाण्याची कमतरता या समस्याही पालकांनी मांडल्या. या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शिक्षक अरुण सपकाळे यांनी प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या गिरीश भावसार यांचे अभिनंदन केले. तसेच पालक-शिक्षक संघाच्या नियमावलीनुसार शाळेचे मुख्याध्यापक हे संघाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, असा ठराव सभेत पारित करण्यात आला.

सभेत ज्येष्ठ शिक्षक टी. बी. पांढरे, उपाध्यक्ष जयवंत सोनवणे आणि सहसचिव दीपाली सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. पालक-शिक्षक संघाचे सचिव रामचंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर नवनियुक्त सहसचिव लीना तायडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button