खान्देशजळगांवसामाजिक

इकरा एच. जे. थिम कॉलेजचा अभिमान! अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सय्यद ताहिरीम सुबूरची निवड

इकरा एच. जे. थिम कॉलेजचा अभिमान! अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सय्यद ताहिरीम सुबूरची निवड

​जळगाव प्रतिनिधी  इकरा ​शिक्षण संस्थेच्या एच. जे. थिम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, जळगावची प्रथम वर्ष बी.एस्सी.ची विद्यार्थीनी सय्यद ताहिरीम सुबूर ५३ किलो वजन गटात हिची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (KBCNMU) प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी’ निवड झाली आहे.
​विद्यार्थिनीच्या या उल्लेखनीय यशामागे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. चांद खान यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि परिश्रम लाभले आहेत, ज्यांच्यामुळे खेळाडूला योग्य ती साथ व प्रोत्साहन मिळाले.
​महाविद्यालयासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत ताहिरीम सुबूर हिने उत्कृष्ट कामगिरी करावी आणि यशाची शिखरे सर करावीत, डॉ अब्दुल करीम सालार, एजाज मलिक व इतर पदाधिकारी यांनी तसेच महाविद्यालय चे प्राचार्य डॉक्टर वकार शेख व महाविद्यालयतील प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.! 💪🏆
​

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button