खान्देशजळगांवसामाजिक

शहीद हजरत टीपू सुलतान जयंतीनिमित्त कौमी एकता फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

शहीद हजरत टीपू सुलतान जयंतीनिमित्त कौमी एकता फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

कन्या शाळा उर्दू नं. २ मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; टीपू सुलतान चौकात पुष्पसजावट करून अभिवादन!

फैजपूर | प्रतिनिधी
शेर-ए-हिंद, शेर-ए-मैसूर शहीद हजरत टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता फाउंडेशनच्या वतीने फैजपूर येथील कन्या शाळा उर्दू नं. २ मध्ये सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थिनींना फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या हस्ते वह्या (बयाज), पेन आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच तहा नगर येथील शहीद टीपू सुलतान चौकाची आकर्षक फुलांनी सजावट करून शहीद टीपू सुलतान यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कौमी एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, सर्व मुलांनी मन लावून शिक्षण घ्यावे, भरपूर अभ्यास करावा आणि आयुष्यात यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला कौमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष कुर्बान अख्तर पहलवान, जफर अली, नासिर भाई, शेख रज्जाक, कासिम कुरेशी, वाहिद कुरेशी, उजैब सैयद, साहिल भांजा यांच्यासह फाउंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित होते.

शहीद हजरत टीपू सुलतान यांच्या शौर्य, देशप्रेम आणि त्यागाच्या स्मृतींना उजाळा देतानाच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कौमी एकता फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून शिक्षणाचा प्रसार आणि समाजात एकतेचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button