खान्देशजळगांव

शेळगाव बॅरेज पुलावरून तापी नदीत उडी; जळगावचे ५३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता

शेळगाव बॅरेज पुलावरून तापी नदीत उडी; जळगावचे ५३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता

आजारपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा चिठ्ठीत उल्लेख; यावल पोलिसांकडून शोधमोहीम

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळ तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या पुलावरून जळगाव येथील राजू शिवाजी नेरकर (वय ५३, रा. सरदार वल्लभभाई पटेल नगर, औद्योगिक वसाहत) यांनी मंगळवारी सकाळी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना घडली. त्यानंतर ते बेपत्ता झाले असून, यावल पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

नेरकर हे एमएच १९ ईआर ९४८४ क्रमांकाच्या दुचाकीने पुलावर आले होते. त्यांनी दुचाकीवर आधारकार्ड, काही कागदपत्रे आणि एक चिठ्ठी ठेवली होती. आजारपणाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुचाकी आणि कागदपत्रे ताब्यात घेतली.

मंगळवारी सायंकाळपर्यंत नेरकर यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे बुधवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button