पारोळा : तालुक्यातील करमाड येथील ५० वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज उघकीस आली. तालुक्यातील करमाड येथील कल्पनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०) यांनी २२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या घरामधील पुढच्या हॉलमध्ये छताला असलेला लोखंडी कडीला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पारोळा पोलिसांत गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.कॉ. प्रदीप पाटील करत आहेत.