खान्देशगुन्हेजळगांवदेश-विदेशशासकीय

राज्य पोलीस दलात १० उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

चोपडा पोलीस उप विभागीय अधिकारीपदी अन्नपूर्णा सिंह

जळगाव /नागपूर ;- सरदार वल्लभ भाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद येथून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या १८ डिसेंबर पासून रुजू होणाऱ्या राज्यातील १० परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज १५ रोजी गृह विभागाने काढले असून चोपडा येथे अन्नपूर्णा सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारीपदी नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

केज जी. बीड येथे कमलेश मीना ,पुलगाव वर्धा येथे राहुल चव्हाण,चोपडा ता.जी. जळगाव येथे अन्नपूर्णा सिंह ,वरोरा चंद्रपूर , अनमोल मित्तल यांची अकोट जिल्हा अकोला ,चाकूर येथे सुरज भाऊसाहेब गुंजाळ,नांदेड शहर अनिल म्हस्के,दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे रजनीकांत चिलूमुला , सोलापूर ग्रामीणमधील अकलूज येथे श्रीमती किरितीका सीएम , तर नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकरी पदावरून सुरज गुरव यांची बदली करण्यात आली असून त्यांचे स्वतंत्रपणे बदलीचे आदेश काढण्यात येणार आहे. गृह विभागाचे श सचिव व्यंकटेश भट यांनी आज हे आदेश काढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button