खान्देशगुन्हेजळगांव

जळगावातून ट्रक चोरणाऱ्या चोरट्याला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : ट्रक शहरातील रामनगर भागातून चोरून पसार झालेल्याआरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बढे यांनी 9 दिवस पोलिस कोठडी सुनावली.

समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. रामनगर भागातील एका खासगी रुग्णालयासमोरून ८ सप्टेंबर २०२२ रोजी जावेद लतिफ पटेल (रा. रामनगर) यांच्या मालकीची ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ४८४६) चोरीला गेली होती, मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या काशिमीरा गुन्हे शाखेने समीर नसीर खानकडून ही ट्रक जप्त केली. त्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, राहुल रगडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी समीर खान याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button