जळगावात जश्ने यौमे जम्हूरिया उत्साहात साजरा
जळगाव;- ७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दर सालाबाद प्रमाणे यंदाही आज भीलपुरा येथे सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे जश्ने यौमे जम्हूरिया (भारतीय प्रजासत्ताक दिन उत्सव) अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम भगवा ,पांढरा व हिरव्या म्हणजेच तिरंगा रंगाचे फुगे हवेतून आकाशात उंच सोडण्यात येऊन त्याद्वारे विविधता मे एकता, हम सब एक है संविधानात नमूद करण्यात आलेल्या प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक उत्तम असा संदेश देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत पठण करण्यात आले. तसेच याप्रसंगी भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, जिंदाबाद जिंदाबाद जश्ने यौमे जम्हूरिया जिंदाबाद, हम सब एक है, हिंदुस्तान जिंदाबाद, जय हिंद जय भारत अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. याप्रसंगी सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज होता.
याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, योगेश मराठे, हाजी शकूर बादशहा ,हाजी निसार अहमद, शफी ठेकेदार, रवींद्र खैरनार, रफिक पेंटर, सतीश कासार, हुसेन कादरी, हाजी मोहम्मद जब्बार, मोहम्मद हबीब डॉ. परीमल मुजुमदार , हाजी जिन्हा नागोरी,असगर अकबर, दानिश हुसेन, आसिफ मुनाफ, मनोज सेठिया, रफिक मास्टर , नूर मोहम्मद, शेख अरशद, शेख नझरुद्दीन, आवेश शेख, अजिज मास्टर , शेख आरिफ , नूर जावेद, नंद कुमार वाणी, आदील शेख इत्यादी उपस्थित होते.