खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

जिल्हा कारागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण

जळगाव,;- जळगाव जिल्हा कारागृहात मानवी स्पर्शाद्वारे चालणाऱ्या ई-किऑक्स मशीनचे पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते २६ रोजी प्रजासत्ताकदिनी लोकार्पण झाले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद भाप्रसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अंकित,भाप्रसे, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अनिल रघुनाथ वांढेकर व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ई-प्रिसन्स् (e-prisons) च्या बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत मा.श्री.अमिताभ गुप्ता,अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुधारसेवा पुणे , मा.डॅा.जालीदंर सुपेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे , कारागृह सुधारसेवा,व मा.श्री यु.टी. पवार, कारागृह उपमहानिरीक्षक छ संभाजीनगर यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे एक नग किऑक्स (Biometric Touch Sereen e-Kiosk Machine) मशीन कारागृहास प्राप्त झाले आहे. या मशिनद्वारे कारागृहातील बंद्यांना केसबाबतची स्थिती, कैदीच्या खात्यात शिल्लक खाजगी रोख क्कम, पुढील सुनावणीची तारीख, माफी, मजुरी , पॅरोल / फर्लो अर्जाची स्थिती, उर्वरित फोन व मुलाखत संधी यांची माहिती घेता येईल.

छत्रपती संभाजीनगरच्या समता फौंडेशनच्या वतीने कैद्यांच्या मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीचे २ संच भेट देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button