जळगाव ;– तालुक्यातील मन्यारखेडा येथून १४ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कदायक प्रकार १० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने १० रोजी फूस लावून नेल्याची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिल्यावरून नशिराबाद पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्य्क फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.