

जळगाव l प्रतिनिधी l नशिराबाद परिसरातील सराईत गुन्हेगार शोएब शेख गुलाम नबी उर्फ शोएब बिल्डर (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये १ वर्षाकरिता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह येरवडा (पुणे) येथे करण्यात आली आहे.
संशयित शोएब बिल्डर याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, बेकायदेशीर गर्दी जमवून मारहाण करणे व तडीपारी आदेशाचे उल्लंघन यांसारखे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाया आणि वाढत्या दहशतीमुळे नशिराबाद पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. योगिता नारखेडे यांनी त्याच्याविरुद्धचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर शोएबला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात पाठवण्यात आले.
कारवाई करणारे पोलीस पथक:
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ उपविभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. योगिता एम. नारखेडे, पोउपनि प्रिया दातीर, पो.हे.कॉ. गुणवंत देशमुख (ब.नं. २९१५), पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे (ब.नं. २०९६), पो.कॉ. भरत बाविस्कर (ब.नं. ३४६), पो.कॉ. पंकज सोनवणे (ब.नं. ४७६), पो.कॉ. प्रविण लोहार (ब.नं. ४२४) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. सुनिल दामोदरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




