खान्देशगुन्हेजळगांव

माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन

माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन

एल. के. फार्महाऊस प्रकरणात दिलासा; दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर निर्णय

जळगाव : ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर झालेल्या पोलिस छापेमारी प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेल्या कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या कुटुंबीय व समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर छापा टाकत बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले होते.

न्यायालयीन लढा आणि निर्णय
अटकेनंतर कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी जिल्हा व उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

जामीन मंजूर झाल्यानंतर कोल्हे लवकरच कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button