खान्देशगुन्हेजळगांव

रेल्वे अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे रेल्वे पोलिसांचे आवाहन

रेल्वे अपघातात अनोळखी पुरुषाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे रेल्वे पोलिसांचे आवाहन

शिरसोलीजवळ रेल्वेखाली आल्याने मृत्यू; नागरिकांनी माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा

जळगाव : शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आल्याने सुमारे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून नागरिकांनी ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी रात्री ११.३२ वाजण्यापूर्वी शिरसोली रेल्वे स्थानकाजवळील कि.मी. क्रमांक ४०८/२७ येथे ट्रेन क्रमांक १२१४३ खाली आल्याने संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती जळगाव रेल्वे स्थानकावरील ऑन ड्युटी स्टेशन मास्टर यांनी रेल्वे पोलिसांना दिली.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून अंगात आकाशी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट होती. शरीरयष्टी मजबूत, रंग सावळा असून डोक्याच्या वरच्या भागात टक्कल हे ओळखचिन्ह आहे.

मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास रेल्वे पोलीस चौकी, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या अनोळखी पुरुषाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी रेल्वे पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन रेल्वे पोलीस चौकी, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button